पत्नीला आणण्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाचा घाला

accident
accidentesakal

साकोरा (जि. नाशिक) : मनमाड चांदवड महामार्गावरील दुगावजवळ गॅसटँकर आणि दुचाकीची धडक झाली. या धडकेत नांदगाव येथील संदीप दिनकर शिंदे (वय 27) हा युवक जागीच ठार झाला. (Young man died in accident)

घरातील कर्ता गेला....

नांदगाव येथून वडनेर भैरव येथे आपल्या पत्नीला घरी आणण्यासाठी निघालेले संदीप यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या गॅस टँकरने जोरदार धडक दिली. या धडकेने संदीप उधळून ट्रकच्या चाकाखाली गेला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत संदीप शिंदे हा नांदगाव बसस्थानकाजवळ येथे वास्तव्यास होता. त्याला आठ महिन्याची लहान मुलगी असून पत्नी, भाऊ, दोन बहिणी, आई, वडील असा परिवार आहे. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना आपल्या भावासह मजुरीचं काम करत होता. घरातील कर्ता मुलगा गेल्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

accident
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून नाशिकच्या व्यावसायिकाची फसवणूक? गुन्हा दाखल

तीन दिवसात दुसरा अपघात

17 मार्च रोजी नाशिक चांदवड महामार्गावरील सोग्रस फाट्याजवळ अपघातात नांदगाव येथील युवक आकाश हिरे याला अपघातामुळे आपला जीव गमवावा लागला. तीनच दिवसात नांदगाव येथील दोन युवकांना अपघातात जीव गमवावा लागल्याने नांदगावकरांवर शोककळा पसरली आहे.

accident
नाशिक : ‘त्या’ तरुणीची आत्महत्या नव्हे, हत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com