त्या तरुणाची वधू मुलगी नसून एक 'किन्नर'! एका आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अन् तरुणाने बांधल्या 'किन्नर'शी रेशीमगाठी! 
एका आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा

अन् तरुणाने बांधल्या 'किन्नर'शी रेशीमगाठी! एका आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा

मनमाड (जि.नाशिक) : आपण अनेक लग्ने बघितली असतील, पण मनमाडमध्ये एका वेगळ्या रेशीमगाठीची चर्चा होत आहे, ती म्हणजे, एका तृतीयपंथीयाच्या लग्नाची. मनमाड शहरातील किन्नरने लग्न करून येवला तालुक्यातील सूनबाई होण्याचा मान मिळविला आहे. अगदी नववधूचे जसे सासरी स्वागत केले जाते, अगदी तसेच स्वागत किन्नरचे करण्यात आले. (young-man-married-transgender-manmad-nashik-marathi-news)

त्या तरुणाची वधू मुलगी नसून एक 'किन्नर'!

लग्न हे साताजन्माची गाठ म्हटली जाते. मात्र या अनोख्या लग्नात वधू मुलगी नसून किन्नर आहे. किन्नरांच्या महंत समजल्या जाणाऱ्या महंत शिवलक्ष्मीने साध्या रीतिरिवाजाप्रमाणे मनमाडजवळील नागापूरच्या प्राचीन नागेश्वर महादेव मंदिरात येवल्याच्या मातुलठाण येथे राहणाऱ्या संजय झाल्टे या सुशिक्षित तरुणाशी विवाह केला. या लग्नसोहळ्याला परिवारातील मोजके लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे दोन्ही कुटुंबांनी वर-वधूच्या इच्छेला मान देत हे लग्न पार पाडले. महंत शिवलक्ष्मी व संजयच्या प्रेमकहाणीची आणि साताजन्माची गाठ पडायची कथाच वेगळी आहे. महंत शिवलक्ष्मी व संजयची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. या दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही. समाज काय म्हणेल याकडे लक्ष न देता या दोघांनी लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. समाजसंकेत झुगारून या विवाहाला समाज कितपत स्वीकारेल, याची दोघांनाही भीती नव्हती. कुटुंबीय होकार देतील का याची मात्र चिंता होती. प्रेमासाठी दोघांनीही आपल्या कुटुंबांची संमती मिळविली. दोघेही रेशीमगाठीत बांधले गेले.

हेही वाचा: माझी शूटिंग काढा’ अन् क्षणातच पुलावरून तरुणाची नदीत उडी

नववधूप्रमाणे रीतिरिवाज

अगदी नववधू-वराप्रमाणे लक्ष्मीचे सासरी म्हणजे येवला तालुक्यातील मातुलठाण येथे घरी स्वागत करण्यात आले. पती-पतीप्रमाणे संसार करण्याचे स्वप्न हे नवदांपत्य पाहत आहे. विशेष म्हणजे हा विवाह सोहळा आगळावेगळा जरी असला तरी रीतसर सर्व धार्मिक विधी करण्यात आले. नववधू आता पहिले मूळ लावून येवला येथे माहेरी नांदायला गेली आहे. संजयच्या कुटुंबाने समाजाचा विचार न करता महंत शिवलक्ष्मीला सून म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा जिल्ह्यात होत आहे.

हेही वाचा: सुरगाण्यातून गुजरातमध्ये पोचविल्या जायच्या नकली नोटा

Web Title: Young Man Married Transgender Manmad Nashik Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikYouthweddingmanmad
go to top