NSK26H33028
जळगाव : व.वा. वाचनालयातर्फे उत्कृष्ट बालवाचक पुरस्कार देताना कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी. शेजारी ॲड. सुशील अत्रे, अनिलकुमार शाह, प्रा. शुभदा कुलकर्णी, प्रा. शिल्पा बेंडाळे, ॲड. हेमंत भंगाळे, स्वाती ढाके.
––––
वीरा धांडेंला ‘व.वा.’चा
उत्कृष्ट बालवाचक पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १९ : व. वा. जिल्हा वाचनालयातर्फे यावर्षी एप्रिल ते जून महिन्यात विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या वाचन स्पर्धेतील उत्कृष्ट बालवाचक पुरस्कारांचे कुलगुरु डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यात वीरा धांडे ही विद्यार्थिनी उत्कृष्ट बालवाचक पुरस्काराची मानकरी ठरली.
वाचनालयाच्या बाल विभागातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमास उपाध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, कार्याध्यक्ष सीए अनिलकुमार शाह, चिटणीस प्रा. शुभदा कुलकर्णी, प्रा. शिल्पा बेंडाळे, रोटरीचे अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके यांची प्रमुख उपस्थिती होती. व. वा. वाचनालयाच्या स्पर्धेत कौस्तुभ सहजे, भव्य भूरट, चिन्मय जोशी, प्राची डोके आणि अर्णव पाटील या पाच विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त केले. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, रोख रक्कम, ज्ञानसागरातील शिंपले या पुस्तकांचा एक संच आणि व. वा. वाचनालयाचे नाव व वाचन संदेश देणारे भिंतीवरील घड्याळ असे होते.
समृद्ध राष्ट्रासाठी वाचन हा राजमार्ग असून जेवढी बौद्धिक संपदा आणि पुस्तके जास्त ते राष्ट्र समृद्ध मानले जाते; असे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी सांगितले. बालविभाग समिती सदस्य प्रीती झारे यांनी सूत्रसंचालन केले. तर शिल्पा बेंडाळे यांनी आभार मानले.
––––––––––