प्रवासात तरूणीचा विनयभंग, संशयितास अटक

प्रवासात तरूणीचा विनयभंग, संशयितास अटक
Published on: 
प्रवासात तरुणीचा विनयभंग, संशयितास अटक सकाळ वृत्तसेवा सोनगीर, ता. ६ : ठाण्याहून भोपाळला जाणाऱ्या एका खासगी लक्झरी बसमध्ये झोपलेल्या एका तरुणीने (वय २५) विनयभंग झाल्याची तक्रार येथील पोलिस ठाण्यात दिली असून, लक्झरीच्या सहचालकाला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ६) पहाटे घडली. मुंबई येथे खासगी कंपनीत असलेली तरुणी आणि तिची लहान बहीण दिवाळीनिमित्त भोपाळला जाण्यासाठी वर्मा ट्रॅव्हल्स (एमपी ०४, वायक्यू ५५३३) खासगी बसमध्ये गुरुवारी (ता. ५) सायंकाळी ठाण्याहून बसले. दरम्यान, बसमधील सहचालक जावेदखान गुलाबखान मन्सुरी (वय ४१, रा. ग्यारसपूर, जि. विदिशा, मध्य प्रदेश) प्रवाशांच्या दोन्ही बाजूच्या सीटच्या मधल्या लॉबीत येऊन झोपला होता. इतर प्रवाशांनी त्याला तेथे झोपण्यास विरोध केला. मात्र, मी ट्रॅव्हल्सचालक आहे, असे सांगून तेथून हटण्यास नकार दिला. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास संशयित जावेदखान याने गाढ झोपलेल्या फिर्यादी तरुणीचा विनयभंग केला. या प्रकारामुळे तरुणी जागे होऊन तिने आरडाओरड केला. तिने घडलेला प्रकार सहप्रवाशांना सांगितला. तरुणीने तत्काळ ११२ या पोलिस आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून मदत मागितली. बस सोनगीरजवळ असल्याने येथील पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी ती बस सोनगीर टोलनाक्याजवळ अडवली आणि बससह संशयिताला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून सोनगीर पोलिस ठाण्यात आरोपी जावेदखान मन्सुरी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.