महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग

महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग
Published on: 
महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग फोटो व्हायरलची धमकी देणारा संशयित अटकेत सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : शहरातील रेल्वेस्थानक शेजारील मानसिंह मार्केट परिसरात तरुणीचा छळ करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. सोबतच संशयिताने मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळ भुसावळ तालुक्यताील रहिवासी १८ वर्षीय पीडिता जळगाव शहरात शिक्षण घेत होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या रेहान शेख (वय २१) या संशयीताने वर्ष- २०२४ पासून ते आजपर्यंत इच्छेविरुद्ध तिच्यावर पाळत ठेवून वारंवार विनयभंग केला. तसेच आज (ता.४) सकाळी साडेदहा अकरादरम्यान जळगाव रेल्वेस्थानकाजवळील मानसिंह मार्केट परिसरात सार्वजनिक रस्त्यावर संशयिताने पुन्हा तिचा पिच्छा पुरवून छेड काढली. चौकट फोटो व्हायरलची धमकी फिर्यादीच्या मोबाईलमधील तिचे काही फोटो काढून ते सोशल मीडियावर किंवा इतरत्र व्हायरल करण्याची धमकी देऊन संशयिताने तिला ब्लॅकमेल केले. या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने जळगाव शहर पोलिस ठाण्यात गाठून तक्रार दिल्यावरुन, संशयित रेहान शेख (वय २१ रा. एजीसी स्कूलजवळ, भुसावळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस निरीक्षक सावित्री ढगे तपास करीत आहेत. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.