टुडे ४ : ॲंकर
NSK26H34412
जळगाव : विकसित भारत युवा संवाद कार्यक्रमात लोकशाहीची शपथ देताना खासदार स्मिता वाघ, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे आदी.
-------
NSK26H34413
समोर शपथ घेताना वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी.
----------
शहरात २५० युवकांनी घेतली लोकशाहीची शपथ
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विकसित भारत युवा संवाद कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत मेरा युवा भारत जळगाव यांच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘विकसित भारत युवा संवाद - ‘नो यूवर व्होट’ या कार्यक्रम आज झाला. देशभरातील ५०० विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये २६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेल्या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत झालेल्या या कार्यक्रमात २५० हून अधिक विद्यार्थी व युवकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाला जळगावच्या खासदार स्मिता वाघ प्रमुख पाहुण्या होत्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, उपअधिष्ठाता डॉ. उमेश लाड, हर्षल सिखवाल, मेरा युवा भारत, जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे उपस्थित होते.
कार्यक्रमात युवा आयकॉन कुमुदिनी झा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी युवकांमध्ये मतदान व लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. यावेळी उत्तराखंड येथे आयोजित राष्ट्रीय ग्रॅपलिंग कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त करणारे शरद हटकर यांचा त्यांच्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीबद्दल विशेष गौरव करण्यात आला. दुर्वा काळे यांनी सूत्रसंचालन केले. समारोप लोकशाहीची शपथ घेऊन करण्यात आला. आभार डॉ. विलास मालकर यांनी मानले.
चौकट
खासदार वाघ यांचा युवकांशी संवाद
यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी युवकांशी संवाद साधला. विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. देशाच्या विकासप्रक्रियेत युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि लोकशाही मूल्यांचे जतन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
--------