युवा संवाद कार्यक्रम

युवा संवाद कार्यक्रम
Published on: 
धुळे टुडे १ साठी... --- गंगामाई अभियांत्रिकीत आज विकसित भारत युवा संवाद --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २९ : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत माय भारत केंद्र, धुळे यांच्या वतीने गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालय, नगाव (धुळे) येथे शुक्रवारी (ता. ३०) दुपारी दोनला ‘विकसित भारत युवा संवाद- आपले मत जाणून घ्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माय भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी भूषण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. देशभरातील ५०० विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये २६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेल्या ‘विकसित भारत युवा संवाद’ उपक्रमाचा हा एक भाग आहे. युवकांमध्ये लोकशाही मूल्ये, मतदानाचे महत्त्व, निवडणूक प्रक्रिया आणि जबाबदार नागरिकत्व याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असून, लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थी आपले प्रश्न मांडू शकतील, विचारांची देवाणघेवाण करू शकतील तसेच लोकशाही व्यवस्थेतील युवकांची भूमिका समजून घेऊ शकतील. लोकशाही शपथेद्वारे सहभागी युवक लोकशाही मूल्यांचे पालन करणे, जागरूकपणे मतदान करणे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडण्याचा संकल्प करतील. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन माय भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.