Nashik News : बॅनर लावताना पडल्याने युवकाचा मृत्यु

Death News
Death Newsesakal
Updated on

Nashik News : मुंबई नाका परिसरातील नवजीवन इमारतीवर बॅनर लावत असताना पाय घसरून पडल्याने २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यु झाला.

अजय पंढरीनाथ पवार (२५, रा. आयटीआय सिग्नलजवळ, सातपूर) असे मयत युवकाचे नाव आहे. (Youth died after falling while putting up a banner Nashik News)

गेल्या बुधवारी (ता १४) दुपारी चार वाजेच्या सुमारास अजय हा नवजीवन बिल्डिंगवर होर्डिंग बॅनर लावत होता. त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला.

यात अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याच्या कानातून रक्त येऊ लागले. उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असता, गुरुवारी (ता. १५) दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Nashik Cyber Crime: ‘वर्क फ्रॉम होम’ च्या नादात गमावले 18 लाख; सायबर गुन्हेगाराकडून महिलेची फसवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com