सटाणा - बागलाण तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून ५० लाखांहून अधिक माया जमा करीत गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या युवकास सटाणा पोलिसांनी मोठ्या शिताफीने सिल्लोड (छत्रपती संभाजी नगर) येथून अटक केली. याबाबतची माहिती अशी : सन २०२३ मध्ये तलाठी परिक्षेत 'कोऱ्या उत्तरपत्रिका ठेवून या, आपल्या पाल्यांना उत्तीर्ण करण्याची व त्यांना नोकरीचे आदेश काढून देण्याची जबाबदारी माझी' अशी बतावणीसटाणा येथील रहिवाशी व आदिवासी विकास विभागात नोकरीला असलेले प्रतिक मदन पाठक याने शहरासह तालुक्यातील अनेक सुशिक्षित पदवीधरांना चुकीची माहिती देत लाखो रूपये जमा केलेत.