नाशिक: कोरोनामुळे ‘ऑनलाइन एज्युकेशन’, ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना अस्तित्वात आली. कोरोना ओसरताच शाळा-महाविद्यालये अन् कार्यालयेही नियमित सुरू झाली आहेत. मात्र, त्या काळात मोबाईलसह हेडफोनचा वापर वाढला. हेडफोनच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. ऐन तिशीतील तरुणांमध्ये बहिरेपणाचे दोष आढळून येत आहेत, तर शालेय-महाविद्यालयीन मुलांची श्रवणशक्ती कमजोर झाल्याची गंभीर बाब समोर आली असून, ही बाब तरुणाईच्या दृष्टिकोनातून चिंताजनक, तर आहेच; मात्र गंभीरही आहे.