Malegaon Crime : मालेगावात २५ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून; पोलिसानी काही तासांतच आरोपीला पकडले
Dispute Turns Deadly in Malegaon: Youth Strangled to Death : मालेगावच्या सुजन टाकी परिसरात २५ वर्षीय अमोल निकम याचा वादातून गळा दाबून खून करण्यात आला; स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला काही तासांत अटक केली.
मालेगाव- आपसांतील वाद व शिवीगाळ केल्याच्या रागातून मालेगावला एकाने २५ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही तासातच गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या.