NSK26H34802
जळगाव : दिवाळीनिमित्त समाजबांधवांना फराळवाटप करताना पदाधिकारी व युवक मंडळाचे सदस्य.
शिंपी समाज युवक मंडळातर्फे फराळवाटप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित युवक मंडळाच्या वतीने ‘मी समाजाचा, समाज माझा’ या संकल्पनेतून समाजातील २५ गरजू समाजबांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. युवक मंडळाच्या या उपक्रमामुळे समाजबांधवांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
शहरातील हरिविठ्ठल नगर, कांचन नगर, बालाजी पेठ आणि लक्ष्मी नगर या परिसरांतील समाजबांधवांच्या घरी जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. समाजातील प्रत्येक कुटुंबाने दिवाळीचा सण आनंदाने साजरा करावा, तसेच समाजातील परस्परांतील आपुलकी आणि बंधुभाव वृद्धिंगत व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या वेळी समाजाध्यक्ष विवेक जगताप, कार्याध्यक्ष मनोज भांडारकर, उपाध्यक्ष दिलीप सोनवणे, सचिव अनिल खैरनार आणि किरण सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी युवक मंडळाचे अध्यक्ष योगेश शिंपी, कार्याध्यक्ष गणेश सोनवणे, उपाध्यक्ष भूषण सोनवणे, उमेश शिंपी, सचिव निखिल सोनवणे, सतीश सोनवणे, जयेश शिंपी, गिरीश देवरे, कल्पेश खैरनार आणि योगराज शिंपी यांनी परिश्रम घेतले.