धुळे : टुडे पान २ साठी...
---
फोटो क्रमांक : 34894
धुळे : ‘एक करंजी शेतकरी बांधवांसोबत’ उपक्रमांतर्गत बैलगाडीने जाणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांना फराळ देताना युवासेना जिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे.
---
युवा सेनेचा ‘एक करंजी’ उपक्रम
दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन साधला आपुलकीचा संवाद
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १२ : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण असताना संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत युवा सेनेच्या वतीने जिल्ह्यात संवेदनशील पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली. ठाकरे सेनेच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात ‘एक करंजी शेतकरी बांधवांसोबत’ हा विशेष उपक्रम राबवून कार्यकर्त्यांनी थेट बळीराजाच्या घरोघरी जाऊन सणाचा आनंद द्विगुणित केला.
निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा शेतकरी आर्थिक व मानसिक अडचणीतून जात आहेत. अशा परिस्थितीत उत्सवाचा अवाजवी खर्च टाळत आणि सामाजिक बांधिलकी जपत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी थेट ग्रामीण भागातील बळीराजाच्या घरी भेट दिली. घरातील सदस्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांना दिवाळीचा फराळ व करंजी सुपूर्द केली, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण फुलले. या उपक्रमांतर्गत युवा सैनिकांनी खेडोपाड्यातील शेतकरी कुटुंबांच्या दारी जाऊन सदिच्छा भेट दिली आणि त्यांची आपुलकीने विचारपूस केली. बळीराजाला एकाकी वाटू नये, यासाठी प्रेमाचा फराळ वितरित करण्यात आला. केवळ सण साजरा न करता दुष्काळात अडकलेल्या बळीराजाला मानसिक व भावनिक दिलासा देण्याचे मोठे काम या माध्यमातून झाले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे आज तो संकटात असला, तरी सणाच्या दिवशी त्याच्या घरात निराशेचे सावट राहू नये, हा उपक्रमाच्या उद्देश असल्याची प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख कानकाटे यांनी व्यक्त केली.