यिनच्या ‘युथ नेक्स्ट जेन’ विशेषांकाचे प्रकाशन

यिनच्या ‘युथ नेक्स्ट जेन’ विशेषांकाचे प्रकाशन
Published on: 
‘यिन’च्या ‘यूथ नेक्स्ट जेन’ विशेषांकाचे प्रकाशन कौशल्य शिक्षण, उद्योजकता आणि तंत्रज्ञानातील संधींवर प्रकाश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर नेटवर्क’ (यिन)तर्फे ‘यूथ नेक्स्ट जेन’ विशेषांकाचे प्रकाशन अभिनेते चेतन वडनेरे, ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, सरव्यवस्थापक संजय पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी प्रवीण काळोखे, बालरंगभूमी परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष महेश डोकफोडे, ‘यिन’चे राज्य समन्वयक अधिकारी अनिकेत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात बुधवारी (ता. १४) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. या विशेषांकातून करिअरच्या नवनवीन संधी, कौशल्याधारित शिक्षण, उद्योजकता, डिजिटल तंत्रज्ञान आणि सामाजिक परिवर्तन अशा विविध विषयांचा वेध घेण्यात आला आहे. ऑटोमोबाईल उद्योग, जाहिरात क्षेत्र, फॅशन उद्योग, डिजिटल कंटेंट, क्रिएटर्स इकॉनॉमी, मानसोपचार, अभियांत्रिकी शिक्षण आणि कौशल्याधारित प्रशिक्षण अशा क्षेत्रांतील संधींची माहिती विशेषांकात देण्यात आली आहे. रोजगाराच्या नव्या वाटा, स्टार्ट अप्ससमोरील आव्हाने, आर्थिक साक्षरता आणि तंत्रज्ञानातील बदल यांसारख्या विषयांतून तरुणांना करिअरविषयक निर्णय घेण्यासाठी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर, सोशल मीडियाचा अर्थपूर्ण उपयोग आणि समाजपरिवर्तनातील युवकांची भूमिका यांवरही विशेषांकात भर देण्यात आला आहे. युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे आणि सामाजिक प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण करणे, हा ‘यिन’ उपक्रमाचा उद्देश आहे. प्रकाशन फोटो : H32493 कोट सकाळ ‘यंग इन्स्पिरेटर नेटवर्क’च्या माध्यमातून तरुणाईला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आले आहे. ‘यिन’च्या विशेषांकातून हाच प्रेरणादायी प्रवास पुढे नेण्यासाठी महाविद्यालयीन युवकांना प्रोत्साहन मिळेल. ‘सकाळ’च्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होताना आमच्या संस्थेचे नेहमी सहकार्य असते. त्याप्रमाणे ‘यिन’च्या या विशेषांकाला पाठबळ देण्याचे काम आमच्या संस्थेने केले आहे. -डॉ. रवींद्र सपकाळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सपकाळ नॉलेज हब फोटो : (३२६४४)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com