Zilla Parishad
sakal
नाशिक: पन्नास टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद आणि पंधरा पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. पण, जिल्हा प्रशासनातर्फे मतदारयाद्यांची दुरुस्ती केली जात आहे. या मोहिमेंतर्गत ३३ हजार दुबार मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे यादीतून वगळण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका अधिक पारदर्शी पार पाडण्यासाठी मदत होणार आहे.