CEO Omkar Pawar
sakal
नाशिक: आपल्या पदाचा बडेजाव मिरविण्यासाठी शासकीय नियमांना बगल देत महागडी वाहने भाडेतत्त्वावर घेणाऱ्या अधिकाऱ्यांना आता शासनाने चांगलाच धक्का दिला आहे. अशा वाहनांवर जादा मोजलेली रक्कम थेट संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिले आहेत.