नाशिक- जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया सुरू असून, संवर्ग एक अंतर्गत ६६२ शिक्षकांची बदली झाली. यात मालेगाव तालुक्यातून सर्वाधिक १०३ शिक्षकांचा समावेश आहे. संवर्ग दोन अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शिक्षकांना आता ‘प्राधान्य अर्ज’ भरण्याची संधी मिळेल.