नाशिक: ग्रामविकास विभागाच्या पंचायत प्रगती निर्देशांकांतर्गत २०२२-२३ च्या मूल्यांकनानुसार नाशिक जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे व प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २६) पुणे येथील कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचा गौरव होणार आहे.