नाशिक- कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी लागू असलेल्या ‘पॉश’ कायद्याविषयी पंचायत समिती स्तरावरील समित्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. हे प्रशिक्षण पुढील आठवड्यात जिल्हा परिषद मुख्यालयात होणार असून त्यानंतर तालुकास्तरावरही अशाच प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.