Nashik Zilla Parishad Sports
sakal
नाशिक: जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेत आमदार नितीन पवार व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रस्सीखेच स्पर्धेत सहभागी होत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विभागप्रमुख व गटविकास अधिकारी यांच्यात रस्सीखेच सामना झाला. प्रत्येक वर्षी गटविकास अधिकारी ही रसीखेच स्पर्धा जिंकतात. मात्र, आमदार व जिल्हाधिकाऱ्यांनी हा सामना जिंकून देण्यात यश मिळविले.