नाशिक- जिल्हा परिषदेच्या काही विभागप्रमुखांविरोधात महिलांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सुरू झालेल्या चौकशीदरम्यान, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधातही तक्रारींचा ओघ सुरुच आहे. या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.