नाशिक- जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक व मानसिक छळ होत असल्याची राज्य महिला आयोगाने दखल घेत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठवत विशाखा समितीच्या कारवाईचा अहवाल मागविला आहे. तक्रारदारांच्या अर्जावर काय कारवाई झाली, याची विचारणा करण्यात आली आहे.