Education
sakal
नाशिक: अभ्यासात निपुण नसलेल्या विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. निपुण महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी दुसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया या मूलभूत अध्ययन क्षमता आत्मसात कराव्यात, हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे.