नाशिक : लाचखोर जि.प.शिक्षणाधिकारी वैशाली झनकरला अटक

vaishali jhankar
vaishali jhankaresakal

नाशिक : शैक्षणिक संस्थाचालकांच्या शिक्षकांकडून ९ लाख रुपयांची लाच (bribe) घेताना रंगेहाथ पकडलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी (zp education officer) डॉ. वैशाली झनकर-वीर (vaishali zankar) या फरार झाल्या होत्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे येथील पथकाने केलेल्या कारवाईतील प्रमुख संशयित माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने एकच खळबळ उडाली होती. कारवाईच्या भीतीने फरार झालेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली वीर झनकर यांना पोलिसांनी (nashik police) अखेर अटक केली आहे. गेल्या महिन्यात संशयित वैशाली वीर-झनकर यांनी ३२ कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनापोटी नऊ लाख रुपयांची मागणी केली होती. संस्थाचालकांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. दरम्यान झनकर यांच्या मागावर असलेल्या पोलीस आणि एसीबीच्या पथकाने त्यांना नाशिकच्या परिसरातूनच ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

मागावर तीन पथके रवाना

शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय कामाच्या मंजुरीसाठी नऊ लाखांच्या लाचेची मागणी करून आठ लाखांची लाच स्वीकारण्याचा श्रीमती झनकर यांच्यावर आरोप आहे. झनकर यांच्यासह प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते आणि शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले यांचा यात समावेश होता. या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून, न्यायालयाने १३ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. पोलिसांना बुधवार सकाळपासून गुंगारा देत फरारी असलेल्या वीर यांच्या चौकशीसाठी त्यांच्या मागावर तीन पथके रवाना केली होती. हा तपास सुरू असताना गुरुवारी (ता. १२) ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अविनाश भिडे यांच्यातर्फे जिल्हा व सत्र न्यायालयात वीर- झनकर यांनी अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता.

vaishali jhankar
लाचखोर शिक्षणाधिकारीच्या मालमत्तेचा शोध; आज सुनावणी

एसीबी कार्यालयात आणले

शैक्षणिक संस्थाचालकांच्या शिक्षकांकडून ९ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर या फरार झाल्या होत्या. रात्री महिलेस अटक करता येत नाही यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. झनकर यांच्या नातलगांचे हमीपत्र घेत डॉ. झनकर यांना घरी सोडले होते. मात्र त्या पोलीस ठाणे तसेच न्यायालयात हजर झाल्या नव्हत्या. इतर दोन सहआरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीश एम एस शेख यांनी वैशाली वीर-झनकर यांना शोधण्याचे तसेच इतर दोघांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. या कारवाईनंतर झनकरला एसीबी कार्यालयात आणण्यात येत आहे. यावेळी ठाणे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षकदेखील उपस्थित असल्याचे समजते.

vaishali jhankar
रेल्वेत नोकरीसाठी 9 लाखांना फसवले; महिला डॉक्टरला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com