ZP Construction Dept. Transfers: जि.प. बांधकामाच्या बदल्यांमध्ये कार्यकारी अभियंत्यांकडून फेरफार?

समुपदेशानंतर कनिष्ठ व स्थापत्य अभियंत्यांच्या बदली आदेशात परस्पर बदल
Transfers
Transfersesakal

ZP Construction Department Transfers : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग एकच्या झालेल्या प्रशासकीय व विनंती बदल्या करताना समुपदेशनाचा दिखावा करण्यात आला आहे.

बदली प्रक्रियेत समुपदेशन झाल्यानंतर झालेल्या बदल्यांमध्ये कार्यकारी अभियंता यांनी स्वतःच्या अधिकारात फेरफार करत, त्यावर मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरी घेऊन बदली पत्र दिल्याचे समोर आले आहे.

यासाठी दिलेले आदेश मागवून रद्द करत संबंधितांना सोईच्या बदल्या देत नव्याने आदेश निर्गमित केले. यात तर, एका अभियंत्यांची तर बदली झालेली नसताना देखील नंतर त्यांची थेट बदली करत आदेश देण्यात आले आहेत.

ग्रामविकास विभागाने प्रशासकीय व विनंती बदल्या पारदर्शकपणे राबविण्याचे स्पष्ट आदेश दिलेले असताना कार्यकारी अभियंता यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. (ZP Manipulation by Executive Engineers in construction department transfers nashik news)

गत महिन्यात बांधकाम विभाग एकमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी व कनिष्ठ अभियंता यांच्या एकूण १९ बदल्या समुपदेशन पद्धतीने झाल्या. यात १२ प्रशासकीय तर ७ विनंती बदल्या झाल्या. समुपदेशन झाल्यानंतर संबंधितांना बदलीचे आदेश देण्यात आले.

मात्र, यात अनेकांची गैरसोय झाल्याने त्यांचाच फायदा घेत कार्यकारी अभियंता यांनी बदल्यांमध्ये परस्पर फेरफार करत बदल केले असल्याचे समोर आले आहे. सिन्नर पंचायत समितीतील बांधकाम उपविभागातील कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता प्रवीण वाघ यांची समुपदेशाने कळवण पंचायत समितीत बदली झाली होती.

परंतु प्रत्यक्षात त्यांना इगतपुरी पंचायत समितीत नियुक्तीचे आदेश देण्यात आले. नाशिक उपविभागातील कनिष्ठ अभियंता चेतन गवळी यांची समुपेदशनात सुरगाणा येथे बदली झाली. मात्र, त्यांना बदली आदेश दिंडोरीचे दिले गेले.

मालेगाव उपविभागातील अभियंता भाऊसाहेब गावित यांची सुरगाणा येथे बदली झालेली असताना त्यांना कळवण येथे बदलीचे आदेश काढण्यात आले. याचप्रमाणे नाशिक उपविभागातील स्थापत्य अभियांत्रिकी स्वाती वाळके यांनी समुपदेशानंतर इगतपुरी तालुक्यात बदली दिली गेली.

चांदवड येथील स्थापत्य अभियांत्रिकी हेमत देवरे यांची समुदेशानात दिंडोरीत बदली झालेली असताना त्यांना बदली आदेश देवळा तालुक्यातील मिळाले. बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी विजय फडोळ यांची तर, समुपदेशात बदली झालेली नव्हती.

मात्र त्यांची थेट इगतपुरीत बदली करत त्यास आदेश देण्यात आले आहे. सदर झालेला फेरफार समोर आलेला असला तरी, इतरही अनेक बदल्यांमध्ये फेरफार झाले असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Transfers
Employees Transfer: ZPत बदल्यांचे रडगाणे सुरूच! बदल्या होऊनही अनेक कर्मचाऱ्यांनी सोडला नाही पदभार

अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अंधारात?

समुपदेशन पद्धतीने बदली प्रक्रीया ही अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झाली. त्यानुसार आदेश देखील काढण्यात आले होते.

परंतु, त्यानंतर यात परस्पर फेरफार करत नव्याने आदेश निघाले. यात बांधकामचे प्रमुख असलेले अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देखील अंधारात ठेवण्यात आल्याचे पुढे येत आहे.

सामान्य प्रशासन विभागालाही कात्रजचा घाट

बदली प्रक्रीया झाल्यानंतर शासन आदेशाप्रमाणे सर्व आदेश सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवून तेथून मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीसाठी जात असतात.

मात्र, नवे बदली आदेशात सामान्य प्रशासन विभागाला देखील कात्रजचा घाट दाखविण्यात आला असून कार्यकारी अभियंता यांनी थेट मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरी घेत आदेश दिले.

"स्थापत्य अभियांत्रिकी यांचे समुपदेशन झाल्यानंतर परस्पर संबंधित कर्मचा-यांने आदेश काढले. यात माझ्यापर्यंत फाइल आली नाही. तर, कनिष्ठ अभियंता बदल्या आदेशावर मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरी झालेल्या नसताना आदेश दिले गेले होते. त्यामुळे हे बदली आदेश रद्द केले. यात कोठेही फेरफार झालेला नसून ग्रामविकास आदेशाप्रमाणे बदली प्रक्रीया राबवून आदेश दिले आहेत." - संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जि. प.

Transfers
Officers Transfer: पोलीस आयुक्त शिंदे यांना बदलीचे वेध; पश्‍चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पदावर लक्ष्य?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com