नाशिक- जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन व लैंगिक छळाच्या तक्रारींची गंभीर दखल घेत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आशिमा मित्तल यांची भेट घेतली. या प्रकरणांच्या निमित्ताने जिल्हा परिषदेची बदनामी होऊ नये. चार भिंतीतच तक्रारींचे निराकरण करा, असे स्पष्ट निर्देश आमदार दराडे यांनी यावेळी दिले.