Nashik News: ZP करणार 51 मॉडेल व्हिलेज; ग्रामस्तरावरील योजनांची होणार प्रभावी अंमलबजावणी

Nashik ZP News
Nashik ZP News esakal
Updated on

Nashik News : पालकमंत्री दादा भुसे यांच्या आदेशान्वये आदर्श गाव योजना सुरू करून त्याद्वारे आदर्श ग्रामपंचायत निर्माण करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले होते.

या आदेशानुसार आदर्श गाव योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्यासाठी जिल्ह्यातील ५१ गावांची निवड केली आहे. निवड करण्यात आलेले ५१ गाव मॉडेल व्हिलेज केली जाणार आहेत. (ZP to make 51 model villages There will be effective implementation of village level schemes Nashik News)

आदर्श गाव योजना सुरू करण्याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी परिपत्रकाद्वारे आदेश निर्गमित केले आहेत. केंद्र शासन, राज्य शासन व शासकीय सर्व विभागांच्या ग्रामविकासाशी संबंधित सर्व योजना राबविण्याकरिता सर्वसमावेशक विकास करण्यासाठी आदर्श गाव योजना सुरू करण्यात येत आहे.

यासाठी २०२३-२४ या पहिल्या वर्षाकरिता स्मार्ट व्हिलेज योजना आणि आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना यात मागील तीन वर्षातील तालुक्यात पहिल्या आलेल्या ग्रामपंचायतींची आणि सांसद आदर्श गाव योजना (SAGY) मधील ५१ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

या योजनांची होणार प्रभावी अंमलबजावणी

घरकुल योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, गावातील सर्व शासकीय इमारतींमध्ये शौचालय बांधणे, गावाचे जल अंदाजपत्रक तयार केले जाणार, सर्व घरांना १०० टक्के नळजोडणी, वृक्षलागवड, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, गावात १०० टक्के पथदीप एलईडी/ सौरऊर्जेवर होणार,

पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार, मासिक सभा, ग्रामसभा, महिला सभा यांची प्रभावी अंमलबजावणी, लसीकरण, किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण, आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, आधार कार्ड, दिव्यांग कार्ड यांचे १०० टक्के वाटप, सामाजिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik ZP News
Nashik ZP Transfer : शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांना सुपर फिफ्टी भोवली; कार्यकाळ पूर्ण न होताच बदली

निवड झालेली गावे

दरी, मुंगसरे, कोटमगाव, गणेशगाव, माणिकखांब (ता. नाशिक), शिरसाठे, मोडाळे, नागोसली (ता. इगतपुरी), वेळुंजे, काचुर्ली, आंबोली, वाघेरा (त्र्यंबकेश्वर), कोपुर्ली बु., शेवखंडी, बोरवठ (पेठ), बुबळी, हातरुंडी, म्हैस खडक (ता. सुरगाणा), करंजवण, कोल्हेर, गोंडेगाव (ता. दिंडोरी), सुळे, नांदुरी, मेहदर (ता. कळवण), पिंपळदरे, रातीर,

नवे निरपूर (ता. बागलाण), वरवंडी, खालप, माळवाडी (ता. देवळा), राजदेरवाडी, हिरापूर, नन्हावे, रायपूर (ता. चांदवड), निळगव्हाण, बेळगाव, मुंगसे (ता. मालेगाव), बोराळे, श्रीरामनगर, भालूर (ता. नांदगाव), महालखेडा, सायगाव, एरंडगाव खु (येवला), थेरगाव, आहेरगाव, साकोरे मिग (ता. निफाड), वडांगळी, चिंचोली, दातली, किर्तांगळी, ठाणगाव (ता. सिन्नर).

Nashik ZP News
Monsoon Update: वरुणराजाच्या हजेरीत 101 टक्क्यांचा ‘शॉर्टफॉल’! धरणातील जलसाठा 45 टक्के कमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.