नव्या वर्षात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेशाची तयारी सुरू

वेळापत्रक निश्‍चित : नाशिकमध्ये ४५० शाळांत होणार साडेचार हजार प्रवेश
rte
rtesakal media
Summary

वेळापत्रक निश्‍चित : नाशिकमध्ये ४५० शाळांत होणार साडेचार हजार प्रवेश

येवला : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशाची नव्या वर्षातील तयारी शिक्षण विभागाने(Department of Education) सुरू केली आहे. २०२२-२३ या वर्षासाठीचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने गुरुवारी (ता. ३०) जाहीर केले असून, येत्या १ फेब्रुवारीपासून पालकांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या वेळापत्रकानुसार २८ डिसेंबर ते ९ मे या कालावधीत प्रवेशप्रक्रिया चालणार आहे. (in this year Preparations for RTE admission at nashik )

rte
नाशिक जिल्ह्यात पुन्हा वाढतेय कोरोनाची रुग्णसंख्या

शिक्षण विभागामार्फत मंगळवार (ता. २८)पासून ही प्रक्रिया सुरू झाली असून, १७ जानेवारीपर्यंत आरटीईअंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळांची पुनर्तपासणी सुरू होणार आहे. प्रवेशासाठी राज्यात उपलब्ध शाळा आणि प्रवेशांच्या जागा जाहीर करण्यात येतील. १ ते २८ फेब्रुवारी दरम्यान पालकांना आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरता येतील. ८ किंवा ९ मार्चला प्रवेशांची सोडत निघणार असून, त्यानंतर प्रवेशप्रक्रियेला सुरवात होईल. निवड झाल्यास पालकांना १० ते ३१ मार्चपर्यंत शाळांमध्ये जाऊन मूळ कागदपत्रे सादर करून प्रवेशनिश्‍चिती करता येईल. १ एप्रिलपासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशफेऱ्या सुरू होणार आहेत. १ एप्रिल ते ९ मेपर्यंत चार टप्प्यांत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. म्हणजेच मेमध्येच प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊ शकेल.

rte
Corona Update: बीड जिल्ह्यात रुग्णसंख्या पुन्हा दोनशेपार

‘आरटीई’ अंतर्गत राज्यात नऊ हजार ४३२ शाळांमध्ये सुमारे ९६ हजार ६८४ विद्यार्थ्यांना दर वर्षी प्रवेश दिले जातात. तर, नाशिक जिल्ह्यात ४५० शाळांमध्ये साडेचार हजार जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. गेल्या वर्षी जिल्ह्यात प्रवेशासाठी १३ हजार ३३० अर्ज दाखल झाले होते. यापैकी चार हजार २०८ विद्यार्थ्यांनी प्रवेशनिश्‍चिती केली, तर तीन हजार २०५ विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया झाली होती.

‘आरटीई’ अंतर्गत पाच वर्षांपासून सर्वसामान्य व गरजू विद्यार्थ्यांनादेखील इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षणाची संधी मिळत आहे. शासनाचा हा उपक्रम वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास प्रोत्साहन देणारा आहे. ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे शासनाने प्रवेश प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांना पूर्ण क्षमतेने प्रवेश द्यावेत. जागा रिक्त ठेवू नयेत.

- प्रवीण गायकवाड, सभापती, पंचायत समिती, येवला

‘आरटीई’ प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक

  1. प्रवेशांच्या जागांची पुनर्तपासणी- २८ डिसेंबर ते १७ जानेवारी २०२२

  2. ऑनलाइन अर्ज भरणे- १ ते २८ फेब्रुवारी

  3. प्रवेशासाठी सोडत : ८ किंवा ९ मार्च

  4. प्रवेशनिश्‍चित करणे : १० ते ३१ मार्च

  5. प्रतीक्षा यादीतील प्रवेश : टप्पा १- १ ते ७ एप्रिल, टप्पा २- ११ ते १९ एप्रिल, टप्पा ३- २५ ते २९ एप्रिल, टप्पा ४- २ ते ९ मे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com