Vidhan Sabha 2019 : भाकपच्या स्टार प्रचारकांमध्ये नाशिकच्या राजू देसलेंचा समावेश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यात १६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असून आपल्या २४ स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यात नाशिकच्या राजू देसले यांचा समावेश आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, कोल्हापुर, धुळे, नगर, नाशिक, बीड औरंगाबाद, परभणी, वाशीम, यवतमाळ, चंद्रपुर, गडचिरोली येथील मतदार संघांचा समावेश आहे.

नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यात १६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असून आपल्या २४ स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यात नाशिकच्या राजू देसले यांचा समावेश आहे. 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यात १६ उमेदवार उभे केले आहेत. यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, कोल्हापुर, धुळे, नगर, नाशिक, बीड औरंगाबाद, परभणी, वाशीम, यवतमाळ, चंद्रपुर, गडचिरोली येथील मतदार संघांचा समावेश आहे. जिल्ह्यात चांदवड, देवळा मतदार संघातुन दत्तात्रय गांगुर्डे यांना उमेदवारी दिली आहे. धुळ्यातुन विकास सैदाणे, नगर शहर मधुन भैरवनाथ वाकडे उमेदवारी करीत आहेत. 

दरम्यान पक्षाने 24 स्टार प्रचारांची नावे जाहीर केली आहेत. त्यात डी राजा, अमरजीत कौर, भालचंद्र कानगो, कन्हय्या कुमार, तुकाराम भम्से, सुभाष लांडे, नामदेव गावंडे, प्रकास रेड्डी, शिवकुमार गणवीर, राम बाहेती, राजन क्षीरासागर, श्‍याम काळे, शांताराम वाळुंज, मिलींद रानडे, लता भिसे, सी.एन. देशमुख, मनोहर टाकसाळ, डॉ महेश कोपुलावार, हौसलाल रहांगडाले, तानाजी ठोंबरे व नाशिकच्या राजु देसले यांचा समावेश आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik's Raju Desales is among the star campaigners of the CPI