National Helpline Service : ज्येष्ठ नागरिकांचा मदतीसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन सेवा!

helpline for old age
helpline for old age esakal

नंदुरबार : मागील काही दशकांमध्ये भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. शहरी व ग्रामीण भागातील ज्येष्ठांना (Old Age) विशेष सेवा पुरवण्यासाठी नवीन मॉडेल्सची आवश्यकता आहे,

यासाठी सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय हेल्पलाइन १४५६७ सुरु करण्यात आली आहे. (National helpline service for senior citizens started by Ministry of Social Justice and Empowerment nandurbar news)

महाराष्ट्रासाठी नॅशनल इंप्लिमेंटिंग एजन्सी, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्रालय महाराष्ट्र शासन व जनसेवा फाउंडेशन पुणे ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय हेल्पलाइन १४५६७ चालवीत आहेत. हेल्पलाइन मिळणाऱ्या सेवा खालील प्रमाणे:

माहिती- आरोग्य - जागरूकता, निदान, उपचार निवारा / वृद्धाश्रम घरे, डे केअर सेंटर पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक आदी. मार्गदर्शन- कायदेविषयक (वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर दोन्ही), विवाद निराकरण (मालमत्ता, शेजारी) आर्थिक पेन्शन संबंधित सरकारी योजना आदी.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

helpline for old age
Nashik News: खेळाडूंसाठी स्वतंत्र आश्रमशाळा उभारणार; आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांची ग्वाही

भावनिक आधार देणे - चिंता निराकरण नातेसंबंध विषयक व्यवस्थापन मृत्यूशी संबंधित शोक जीवन व्यवस्थापन (वेळ, ताण, राग व्यवस्थापन; मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण आदी.) क्षेत्रीय पातळीवर मदत- बेघर, अत्याचार ग्रस्त वृद्ध, ज्येष्ठा हरवलेले व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी आदी.

तरी नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी हेल्पलाइन १४५६७ ला कॉल करून माहिती घ्यावी, समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन हेल्पलाइन चे क्षेत्रीय अधिकारी राहुल पवार यांनी केले.

helpline for old age
Atul Save on NDCC Recovery | एनडीसीसीचे थकबाकीदार आमदार असले तरी वसुली होणार : अतुल सावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com