नांदगावचा निकाल स्पष्ट; भुजबळांचे काय झालं? | Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

- पंकज भुजबळ यांचा नांदगाव विधानसभा मतदाससंघातून झाला पराभव. 

नांदगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव राष्ट्रवादीचे उमेदवार पंकज भुजबळ यांचा नांदगाव विधानसभा मतदाससंघातून पराभव झाला. शिवसेनेचे सुहास कांदे यांनी 14 हजार मतांनी त्यांचा पराभव केला.

येवल्यात वडील छगन भुजबळ विजयी तर नांदगावमध्ये मुलगा पराभूत झाला आहे. छगन भुजबळांच्या मतदारासंघाइतकेच नांदगाव मतदार संघाबाबत उत्सुकता होती. या मतदार संघाच्या मतमोजणीत सकाळपासूनच शिवसेनेच्या कांदे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यत कायम ठेवली.

निकाल असा २३ व्या फेरी अखेर - 

१ ) पंकज भुजबळ ( राष्ट्रवादी ) - ६९६३५
२ ) सुहास कांदे ( शिवसेना ) -  ८३७७१
३ ) राजेंद्र पगारे ( वंचित ) १३३१३
४ ) रत्नाकर पवार ( अपक्ष ) - ११९७०

- नोटा - १२५१


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Candidate Pankaj Bhujbal Defeated in Nandgaon Vidhan Sabha 2019