VIDEO : मी पुन्हां येईन...पुन्हां येईन.."या या या आमच्या बोकांडी बसा..गाण्याने सोशल मिडीयावर हास्यकल्लोळ

प्रमोद दंडगव्हाळ : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर गेले महिनाभर रंगलेले सत्तानाट्य सर्वोच्च न्यायालयाच्या चावडीवर जाऊन पोचले! त्यामुळे अनेकांच्या मनात आता या लांबलेल्या नाटकाचा शेवटचा अध्याय सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली होती आणि त्यामुळेच राज्यातील घराघरांतील टीव्ही सकाळपासून सुरू आहेत. पण आता या गाण्याने आता अजूनच मजा येत असून या नाट्यात अधिक भर पडल्याचे नागरिक सांगत आहेत.

नाशिक : सध्याची राजकीय घडामोड पाहता जिथे तिथे सत्ताकारणाचाच विषय..सरकार स्थापन होईल का..कोणाची सत्ता येईल? अशाप्रकारच्या कितीतरी गरमागरम चर्चांना आता पेव फुटत आहे. अशातच या राजकीय घडामोडीवर आधारित "या या या आमच्या बोकांडी बसा.. मी पुन्हां येईन...पुन्हां येईन...म्हणत बसलाय घसा.."अशा प्रकारचे लोकगीत खांस लोकांच्या आग्रहास्तव मार्केटमध्ये आले आहे. या व्हिडिओला सोशल मिडीयावर लाईक्सचा पाऊस पडताना दिसत आहे.

काय समजं ना...काय उमजं ना...
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर गेले महिनाभर रंगलेले सत्तानाट्य सर्वोच्च न्यायालयाच्या चावडीवर जाऊन पोचले! त्यामुळे अनेकांच्या मनात आता या लांबलेल्या नाटकाचा शेवटचा अध्याय सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली होती आणि त्यामुळेच राज्यातील घराघरांतील टीव्ही सकाळपासून सुरू आहेत. पण आता या गाण्याने आता अजूनच मजा येत असून या नाट्यात अधिक भर पडल्याचे नागरिक सांगत आहेत.आताची स्थिती पाहता टिव्ही लावावा तर "मोठी बातमी मोठी बातमी" याशिवाय आता आयुष्यात आता काही उरलच नाही.. तसेच हे गाणे आल्याने जणू काही सामान्य माणूस आपले दु:ख बोलून दाखवत असल्याचे वाटत असल्याची नागरिकांकडून प्रतिक्रिया मिळत आहे.

काय चाललयं काहीच समजत नाही...

काय समजं ना...काय उमजं ना...हे या गाण्याचे बोल असून खरचं या महाराष्ट्रात काय चाललयं काहीच समजत नाही हे देखील नागरिक बोलवून दाखवत आहेत..हे गाणं एस क़े. ब्रदर्स स्टार म्युझिक कंपनीचे असून संगीत-एस. क़े. ब्रदर्स, गीत- गायक-साजन बेंद्रे, निर्माता-मंगल जाधव,  संकल्पना बापू जाधव, बन्जो -शुभम, वाल्मिकी यांचे हे गाण्याचे बोल असून सोशल मिडीयावर नागरिकांची पसंती मिळत आहे. तसेच या गाण्याचा राजकीय अर्थ न लावता ऐकावे अशी विनंतीही निर्मात्यांकडून करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Song on current affairs of Maharashtra Nashik Marathi News