चाळीसगाव- पोक्सोच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन शहरातील एका टायपिंग इन्स्टिट्यूट मालकाकडे तीन लाखांची मागणी करून एक लाख २० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा आमदार मंगेश चव्हाण यांनी पर्दापाश केला. या प्रकरणातील तक्रारदाराला सोबत घेऊन आमदार चव्हाण यांनी तब्बल चार तास पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. अखेर खंडणी उकळणारा पोलिस कर्मचारी अजय पाटील व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.