लासलगाव- निफाड तालुका शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या यादीत थेट सेवानिवृत्त शिक्षकांचीही नावे समाविष्ट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदल्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविणाऱ्या विन्सेस कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये चुकीचा आणि जुना डेटा अपडेट न झाल्याने हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराची जोरदार चर्चा सुरू आहे.