निजामपूर-जैताणे : गोवर-रुबेला लसीकरणास उदंड प्रतिसाद!

प्रा.भगवान जगदाळे
रविवार, 9 डिसेंबर 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी सकाळी अकराला आरोग्य विभागाच्या सहकार्याने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी घेण्यात आलेल्या गोवर-रुबेला लसीकरण कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभरात शाळेतील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना गोवर-रुबेला लसीकरण करण्यात आले. 

शालेय समितीचे अध्यक्ष अजितचंद्र शाह, संचालक बारीक पगारे, राघो पगारे, सचिव नितीन शाह, निजामपूरचे सरपंच सलीम पठाण, जैताणेचे सरपंच ईश्वर न्याहळदे, पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल आकडे, मुख्याध्यापक जयंत भामरे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पंढरीनाथ सोनवणे, रघुवीर खारकर, पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, सुरेश माळी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सरपंचद्वयींचा शाळेतर्फे व संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. डॉ.अनिल आकडे, मुख्याध्यापक जयंत भामरे, ज्येष्ठ शिक्षक कृष्णा लांडगे आदींनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक सत्यनारायण शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. देविदास पाडवी यांनी आभार मानले.

ग्रंथालय सभागृहात इयत्ता आठवीच्या तेजस्विनी कापडे, पूजा न्याहळदे, राहुल पिंपळे, विक्की भलकारे या विद्यार्थ्यांना डॉ.अनिल आकडे यांच्या हस्ते गोवर-रुबेला लस टोचून कार्यक्रमाचे उदघाटन झाले. सुरुवातीला विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात झाली. त्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर व मदतनीस यांचे एकूण तेरा गट तयार करण्यात आले. या तेरा गटांनी पाचवी ते दहावीच्या एकूण तीस वर्गांतील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना सायंकाळी पाच वाजेपर्यंत गोवर-रुबेला लसीकरण केले. जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, आशा वर्कर, मदतनीस आदींसह शाळेतील पाचवी ते दहावीचे वर्गशिक्षक व इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nizampur-Jaitane Govor-Rubella Vaccination get Response