जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास भारतीय समाजशास्त्रीय संशोधन परिषदेकडून ‘एआय व भविष्यातील कामकाज : भारतातील उपेक्षित समुदायातील आकांक्षा आणि उपजीविकेचे सांस्कृतिक व मानववंशशास्त्रीय विश्लेषण’ या मोठ्या संशोधन प्रकल्पासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेतील अध्यापकांनी भारतीय समाजशास्त्रीय संशोधन परिषद कार्यालयास मेमध्ये प्रकल्प सादर केला होता.