लाईव्ह न्यूज

Agriculture News : उत्तर महाराष्‍ट्राला अवकाळीचा दणका

येवल्यासह सुकी-नांदूर परिसरात गारपीट; जळगाव जिल्ह्यात ५०९ हेक्टरवर केळीचे नुकसान
Agriculture News
Agriculture News sakal
Updated on: 
4 लेख बाकी

येवला- शहरासह ग्रामीण भागात शनिवारी (ता. १२) दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी व गारांच्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. विशेषतः शेतात उन्हाळ कांदा काढून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा कांदा ओला झाल्याने नुकसान झाले आहे.

दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. शनिवारी सकाळपासून वातावरणात उष्णता होती. दिवसभर उकाड्याने हैराण केल्यावर दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक वारा सुटून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील विविध गावांत १५- २० मिनिटे झालेल्या या पावसाने काढून विक्रीस तयार असलेला व काढणीस आलेला कांदा भिजल्याने नासाडी झाली.

अचानक वातावरण बदलून वादळाबरोबर ढगांचा गडगडाट सुरू झाला. सोबतच भर उन्हात टपोरे थेंब पडत पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने शेतात काढून पोळ लावून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. काढणीस आलेल्या कांद्याच्या पातीत पाणी शिरल्याने तो कांदाही आता सडण्याची भीती आहे. कांद्याचे नुकसान टाळण्यासाटी तो चाळीत साठविण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. मका, गहू, भाजीपाल्याचेही नुकसान केले आहे.

पंधरा ते वीस मिनिटे पाऊस

शहरात सुमारे १५ मिनिटे टपोऱ्या थेंबांचा पाऊस असल्याने सर्वत्र पाणी-पाणी झाले. नांदूर, सुकी, बाभूळगाव या परिसरात गारांचा पाऊस झाला. कोटमगाव, धामोडे, भाटगाव, अंदरसूल, धुळगाव, अंतरवेली, सावरगाव या व इतर गावांतही पाऊस झाला. अल्प पाऊस असला, तरी शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे.

गारपिटीने ७३३ शेतकऱ्यांना फटका

रावेर : तालुक्यात शनिवारी (ता. १२) दुपारी झालेल्या जोराच्या गारपिटीमुळे १९ गावांमधील ७३३ शेतकऱ्यांचे सुमारे ५०९ हेक्टरवर केळीचे नुकसान झाले आहे. यात रावेर शहर आणि परिसरातील ३०० हेक्टरवरील केळी पिकाचा समावेश आहे. नुकसान झालेल्या केळीत ऐन कापणीवर आलेल्या केळीचा समावेश आहे.

कापणीला आलेल्या घडांवर गारांचा वर्षाव झाल्याने तेथील भाग काळा पडणार असून, हे परिणाम रविवारपासून दिसायला सुरुवात होतील, असे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आमदार अमोल जावळे यांनी नुकसान झालेल्या केळी पिकाची आणि भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी म्हणून त्यांनी प्रशासनाला तातडीने सूचना दिली .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com