चाळीसगाव- शहरातील महिला व मुलींची छेड काढणाऱ्या मद्यपींसह टवाळखोऱ्यांचा ‘अड्डा’ बनलेले अनधिकृत बांधकाम पालिकेच्या पथकाने शनिवारी (ता.२९) जेसीबीच्या मदतीने अखेर उद्ध्वस्त केले. स्थानिक महिलांनी आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेऊन टवाळखोरांबाबत तक्रारी केल्या, त्याची तातडीने दखल घेऊन पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्यासह प्रत्यक्ष कारवाईच्या ठिकाणी जाऊन तेथील नागरिकांशी चर्चा केली.