
लोकलाजेस्तव तरी वृध्द आई वडीलांना सांभाळावे लागेल. त्यामुळे अंतिम समयी तरी त्यांची हेडसांड होवू नये असा उदात्त हेतू त्यामागे आहे.
सोनगीर : जिल्ह्यातच नव्हे देशभरात आई वडीलांना वृध्दापकाळात वाऱ्यावर किंवा वृृद्धाश्रमात सोडणारी युवा पिढी पहाता सामाजिक अस्वस्थता वाढत आहे. सर्वच जाती - धर्मात अशा घटना घडून येेत असून त्यावर कोणतीही प्रभावी कायदा नसल्याने अनेेक वृध्दांच्या नशिबीत हालअपेष्टाचे जीवन आले आहेे.
जळगावची मोठी बातमी- गिरीश महाजनांविषयी सिडी, पॅनड्राईव्ह; म्हणाले ' ये तो ट्रेलर है..पिक्चर अभी बाकी है !
गावोगावी वृध्द मातापित्यांचे हाल होत असताना सामाजिक जनजागृती व सामाजिक कारवाई प्रभावी ठरू शकते. म्हणून येथील तिळवण तेली समाजाने माता पित्यांना न वागणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार नव्हे तर असहकार करण्याचे ठरवले आहे. त्यांना सर्व कार्यक्रमात बोलवायचे पण त्यांच्याकडील फक्त लग्न व मयताच्या कार्यक्रमात जायचे नाही. मात्र इतरवेळी नेहमीप्रमाणेच संबंध कायम असतील असे ठरले. त्यामुळे किमान लोकलाजेस्तव तरी वृध्द आई वडीलांना सांभाळावे लागेल. त्यामुळे अंतिम समयी तरी त्यांची हेडसांड होवू नये असा उदात्त हेतू त्यामागे आहे.
तेली समाजाची बैठक
यापार्श्वभूमीवर येथील तिळवण तेली समाजाच्या वार्षिक बैठकीत आई वडिलांना वागणे बंधनकारक केले असून न वागणाऱ्या मुलांवर कारवाई करण्याचेे ठरले. दरम्यान लवकरच समाजाचे भव्य मंगल कार्यालय बांधण्याचा निर्णय झाला. त्यासाठी ऐसपैस जागा विकत घेतली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तेली समाजाचे अध्यक्ष नंदकुमार चौधरी होते.
आवश्य वाचा- आशीर्वाद म्हणून स्पिरिटचा खुलेआम अवैध व्यापार
गरजूंना मदत
बैठकीत वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जमाखर्च सादर करण्यात येऊन पुढील वर्षाचे नियोजन करण्यात आले. समाजाच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत निर्णय झाला. गरजूंना आर्थिक मदत देण्यात आली. समाजातर्फे संत जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो. त्याचे नियोजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
तेली पंचमंडळाचे सचिव ज्ञानेश्वर चौधरी, सदस्य मधुकर चौधरी, अशोक चौधरी, प्रवीण चौधरी, गोपीचंद चौधरी, प्रल्हाद चौधरी, तुकाराम चौधरी, किशोर चौधरी, प्रदीप चौधरी, सुरेश चौधरी, छगन चौधरी, एल.बी.चौधरी, सुनील चौधरी, रमेश चौधरी, जीवन चौधरी, पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी, राजेंद्र चौधरी, गोपाल चौधरी, संंजय चौधरी, रामकृष्ण चौधरी, देवबा चौधरी, सुकलाल चौधरी, राजेश चौधरी, रवींद्र चौधरी, भैैय्या चौधरी, भावेश चौधरी आदी समाज बांधव उपस्थित होते.
संपादन- भूषण श्रीखंडे