७० वर्षीय वृध्दाकडून घडले 'हे' भयावह कृत्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

सिन्नर : विंचुरदळवी येथे अंगावर थरकाप उडविणारी रविवारी (ता. 22) रात्री घटना घडली. वाडवडीलांचे पित्र घालण्यासाठी किराणा आणण्यासाठी पैसे मागणाऱ्या पत्नीची, ७० वर्षीय वृध्द पतीने धारदार हत्याराने वार करुन हत्या केली. घरात वार करुन रक्ताच्या थारोळ्यात पत्नीचा मृतदेह रस्त्यावर फरफटत आणत अपघाताचा बनाव करण्यात आला. हिराबाई नामदेव भोर (वय 65, रा. विंचुरदळवी) असे मृत महीलेचे नाव आहे. या प्रकरणी सिन्नर पोलीसांनी पती नामदेव सखाराम भोर (वय 70) याला ताब्यात घेतले आहे. 

सिन्नर : वाडवडीलांचे पित्र घालण्यासाठी किराणा आणण्यासाठी पैसे मागणाऱ्या पत्नीची, ७० वर्षीय वृध्द पतीने धारदार हत्याराने वार करुन हत्या केली. घरात वार करुन रक्ताच्या थारोळ्यात पत्नीचा मृतदेह रस्त्यावर फरफटत आणत अपघाताचा बनाव करण्यात आला. विंचुरदळवी (ता. सिन्नर) येथे ही अंगावर थरकाप उडविणारी रविवारी (ता. 22) रात्री घटना घडली. हिराबाई नामदेव भोर (वय 65, रा. विंचुरदळवी) असे मृत महीलेचे नाव आहे. या प्रकरणी सिन्नर पोलीसांनी पती नामदेव सखाराम भोर (वय 70) याला ताब्यात घेतले आहे. 

वडीलांच्या या भयावह कृत्याबद्दल मुलगा समाधान भोर याने पोलीसांत फिर्याद दिली आहे. विंचुरदळवी येथे मजुरी उदरनिर्वाह करत असलेला नामदेव भोर हा भगुर-पांढुर्ली रस्त्यालगत झोपडीवजा घरात राहतो. त्याने आतापर्यंत पाच बायका केल्या असून मयत हिराबाई ही त्याची पाचवी बायको होती. एका बायकोचा सिन्नर न्यायालयात खावटीचा दावा सुरु आहे. त्याला दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे. मयत हिराबाई हीने तिचा मुलगा समाधान जो वणी येथे रोजंदारीचे काम करतो. त्याला फोन करुन घरी वाडवडीलांचे पित्र असल्याने किराणा घेण्यासाठी पैसे दे व तूही घरी ये असा निरोप दिला. परंतू कामाचा व्याप असल्याने आपण येऊ शकणार नाही असे समाधानने सांगितले.

अखेर हिराबाई हिने पती नामदेव भोर याच्याकडे पित्र घालण्यासाठी घरात किराणा आणावयाचा असल्याने पैसे द्या अशी मागणी केली. परंतू संशयी वृत्तीचा आणि नेहमी हिराबाईला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहान करणाऱ्या नामदेव भोर याने हिराबाई हिला मारहाण सुरु केली. जोरदार मारहाण करत शिवीगाळ करत असल्याने आजूबाजूच्या लोकांनी ही रोजचीच कटकट असल्याने त्याकडे लक्ष दिले नाही. अखेर रागावरील संयम सुटलेल्या वृध्द नामदेव भोर याने धारदार हत्याराने हिराबाईच्या मानेवर वार केला, आणि क्षणार्धात हिराबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. मात्र कृरतेचा कळस गाठत नामदेव याने तीचा मृतदेह ओढत भगुर-पांढुर्ली रस्त्यावर टाकला. नामदेव भोर याने रात्री हे कृत्य केले.

पहाटे रस्त्याच्या कडेला हिराबाईचा चेहऱ्यावर जखमा तसेच रक्त गोढलेल्या अवस्थेत पाहील्यावर सिन्नर पोलीसांना ही माहीती देण्यात आली. याबाबत सिन्नर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असता नामदेव भोर याच्या घरात रक्ताचे डाग आणि घरापासून रस्त्यापर्यंत मृतदेह ओढत आणल्याच्या खूना दिसून आल्या. याबाबत पोलीसांनी नामदेव भोर याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरिक्षक साहेबराव पाटील तपास करीत आहे. वडीलांच्या संशयी आणि खूमशी स्वभावामुळे आपला विवाह जमत नसल्याचे फिर्यादी समाधान याने तक्रारीत म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old man killed his wife in vinchur dalvi