वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

वणी : दरेगाव,(ता. कळवण) येथील खवा व्यावसायीक शेतकरी सुरेश गंगाराम गवळी हे दरेगांवहून पायरपाडा येथे रविवारी ( ता.२२) रात्री आठ वाजेच्या दरम्यान येथे दुचाकीवरुन येत असतांना अहिवंतवाडी घाटातील वळणावर अज्ञात वाहनाने समोरुन धडक दिली. यात सुरेश गवळी यांच्या डोक्यास गंभीर मार लागून जागीच ठार झाले.

वणी :  कळवण रस्त्यावरील अहिवंतवाडी घाटात दुचाकीस अज्ञात वाहानाने उडविल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. दरेगाव,(ता. कळवण) येथील खवा व्यावसायीक शेतकरी सुरेश गंगाराम गवळी,(वय ४८) हे दरेगांवहून पायरपाडा येथे रविवारी (ता.२२) रात्री आठ वाजेच्या दरम्यान येथे दुचाकीवरुन येत असतांना अहिवंतवाडी घाटातील वळणावर अज्ञात वाहनाने समोरुन धडक दिली. यात सुरेश गवळी यांच्या डोक्यास गंभीर मार लागून जागीच ठार झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच दरेगाव ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना याबाबत माहिती दिली. येथील ग्रामीण रुग्णालयात सुरेश गवळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one died in bike accident at vani