बलवंड- गेल्या आठवडाभरात कांद्याचे दर निम्म्यावर घसरल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे. बाजारात नवा कांदा येण्याआधीच भाव कमी झाल्याने लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे..नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील बलवंड, रजाळे, सैताने, तलवाडे, खर्द, वैंदाने भागात कांद्याची लागवड नेहमी केली जाते. गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे असंख्य शेतकऱ्यांनी दिवाळीनंतर पुन्हा कांद्याची लागवड केली. सध्या नव्या कांद्याची सुरुवात बाजारात नुकतीच झाली असून, याआधी तीन हजार रुपये प्रतिक्विंटल कांद्याचे असलेले दर सध्या १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलवर येऊन ठेपले आहे. .या भागातील कांदा प्रामुख्याने मध्य प्रदेशातील इंदूर तसेच गुजरातमधील अहमदाबाद, महाराष्ट्रातील धुळे, चांदवड, लासलगाव येथे विक्रीसाठी जात असतो. सध्या कांद्याचे दर घसरल्यामुळे लागवडीपासून आजतागायत केलेला खर्च निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. आधीच भारनियमनामुळे त्रस्त शेतकरी रात्रीचा दिवस करीत आहे. परंतु, काबाडकष्टाचे फलित होत नसल्याने शेतकऱ्यांपुढे बाजारात कांदा नेण्याआधीच मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे..घोर निराशाकांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क मागे घेतल्यानंतर दरात सुधारणा होईल, अशी आशा उत्पादकांना होती. मात्र, दर घसरल्याने शेतकरी चिंतेत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.