नवलनगर- धुळे येथील देवपूर भागातील रहिवासी श्रीमती पद्मजा प्रदीप टेंभेकर यांनी २७ वर्षांपूर्वीच पती निधनानंतर मुलगा हिमांशू याला कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत संघर्षाला सामोरे जात शिवणकाम, ब्युटी पार्लरसारखे घरगुती उद्योग करून कष्टाने मुलाला शिकवले व घडवले. उपजीविकेसोबत लढाऊ वृत्तीची शिकवण मुलाला दिली. त्यातूनच हिमांशूने केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत आईचे स्वप्न पूर्ण केले.