पाचोरा- येथील पालिकेने २०२५-२०२६ या वित्तीय वर्षासाठी २५५ कोटी ५९ लाख दोन हजार ३४२ रुपये खर्चाचे व आठ लाख १३ हजार १४७ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर केले असून, कोणतीही करवाढ करून नागरिकांवर कोणताही बोजा टाकण्यात आलेला नाही. शहरातील विविध नाविन्यपूर्ण विकासकामांसाठी भरीव तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.