Dhule News : शिक्षकांसह पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये माणुसकी रुजवावी : पंडित प्रदीप मिश्रा

A crowd gathered outside the pendulum on Saturday at Sri Shiv Mahapuran Kathasthala near Hare Medical College.
A crowd gathered outside the pendulum on Saturday at Sri Shiv Mahapuran Kathasthala near Hare Medical College.esakal

Dhule News : मोबाईल, सोशल मीडियाच्या जमान्यातही समाजाची शिक्षकांवर अढळ श्रद्धा आहे. किंबहुना या घटकास भारतीय सभ्यतेत शिवपार्वतीचे स्वरूप मानले जाते.

त्यामुळे त्यांनी त्यांची जबाबदारी जाणून घ्यावी, तर विद्यार्थी, पालकांनी आधुनिकतेत शिक्षकाचे महत्त्व जाणावे, असे सांगत पंडित प्रदीप मिश्रा यांनी मनुष्यजीवनात वेळ वाया घालविणे, योग्य त्या ठिकाणी आपला वेळ खर्च न करणे हेही सर्वांत मोठे पाप असल्याचे ठासून सांगितले.(Pandit Pradeep Mishra statement of Parents along with teachers should inculcate humanity in students )

येथील सुरत-बायपासवरील हिरे मेडिकल कॉलेजलगत बुधवार (ता. १५)पासून श्री शिवमहापुराण कथेचे पंडित मिश्रा निरूपण करीत आहेत. तिचा रविवारी (ता. १९) सकाळी आठ ते अकरा या वेळेत समारोप होणार आहे. चौथे पुष्प शनिवारी गुंफताना पंडित मिश्रा म्हणाले, की आजची पिढी शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर आणि उच्चपदस्थ अधिकारी होत आहे.

मात्र, या पिढीत शिक्षक, पालकांनी माणुसकी रुजविण्याचीही नितांत गरज आहे. या पिढीला माणुसकी जपणारा माणूस बनवता आले पाहिजे. त्यामुळे सर्व मातांची जबाबदारी वाढली आहे. मुलांमध्ये माणुसकी जागृत झाल्यानंतर तो आदर्श अधिकारीदेखील होईल.

शिक्षकांनी लक्ष द्यावे

आजची व भावी पिढी मोबाईलमध्ये व्यस्त दिसते. ऑनलाइन व सोशल मीडियाद्वारे निम्म्यापेक्षा अधिक शिक्षण मुले घेताना दिसतात. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनी मुलांना चुकीच्या मार्गाने किंवा चुकीच्या क्षेत्रात जाऊ नये, तसेच कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी आवाहन केले पाहिजे.

मोबाईल, सोशल मीडियासारख्या साधनांमधील व्यसनांपासून, वाईट गोष्टींपासून विद्यार्थी कसे लांब राहतील याकडे शिक्षकाने अधिक लक्ष दिले पाहिजे. आज लहान मुलेही मोबाईलवर असतात. तेव्हा त्यांना काम सांगितले, तर त्यांची तोंडे कशी होतात ते पाहावे.

A crowd gathered outside the pendulum on Saturday at Sri Shiv Mahapuran Kathasthala near Hare Medical College.
Dhule News : मुंडेंची घोषणा...बोलाचा भात अन्‌ कढी; पीकविमा रकमेशिवाय दिवाळी

मुलगा छोटा असतो; परंतु त्याची चिडचिड मोठी असते. याचे कारण म्हणजे आताचे आई-वडील मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे मुलेही मोबाईलमध्ये व्यस्त दिसतात. ते जाणून आपल्यात काही सकारात्मक बदल केले पाहिजेत.

राग करणे सोडावे

भारतीय सनातन धर्मामध्ये देव साक्षीला महत्त्व आहे. पूर्वी घरात आई अशिक्षित असली तरीही ती मुलाला संस्कारित करून चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत होती. आजची आई तसाच प्रयत्न करते आहे. मात्र, आज मुले संस्कारित करण्याची आवश्यकता आहे. सध्या समाजात सर्वांत मोठा कलह हा मालमत्ता, हाणामारीच्या केसेससंबंधी नव्हे तर घटस्फोटाच्या प्रकरणातून दिसतो.

श्री शिवमहापुराण कथेनुसार आपल्यावर टीका करणारा तसेच अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीवर राग करणे सोडून दिले पाहिजे. समुद्र ज्याप्रमाणे त्याच्यात आलेल्या कचऱ्याला काठावर फेकून देतो. त्याचप्रमाणे प्रत्येक शिवभक्ताने त्याचे मन हे कुणाबद्दलही कलुषित न करता संबंधित व्यक्तीला प्रेमाची वागणूकच दिली पाहिजे.

भगवान शंकर माता सतीसाठी त्यांच्यावर टीका करणाऱ्या दक्ष प्रजापतीच्या घरी जाऊ शकतात, तर आपण का अहंकारात जगायचे? यातून भाविकांनी संदेश ग्रहण केला पाहिजे, असे पंडित मिश्रा यांनी सांगितले.

A crowd gathered outside the pendulum on Saturday at Sri Shiv Mahapuran Kathasthala near Hare Medical College.
Dhule News : साक्री ते पुणे विनाथांबा बस सुरू

धुळ्यात गर्दीचा उच्चांक मोडला

श्री शिवमहापुराण कथास्थळी शनिवारी (ता. १६) गर्दीने सर्व उच्चांक मोडले. कथेच्या निरूपणात शनिवारी तब्बल आठ ते नऊ लाख भाविक दंग झाल्याचे खुद्द पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितले. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावली. कथास्थळी सरासरी ६० एकर क्षेत्रात मंडप टाकण्यात आला.

मात्र, कथेच्या दुसऱ्या दिवसापासून आणखी मंडप वाढवावे लागले. त्यात मंडप क्षेत्र शनिवारी तब्बल शंभर एकरावर गेले. तरीही भाविक भर उन्हात वाहने, टेकडीवर उभे राहून, तसेच हिरे मेडिकल कॉलेजपर्यंतच्या झाडीझुडपात बसून श्री शिवमहापुराण कथेचे श्रवण करताना दिसून आले.

दुपारी एकला कथा सुरू होण्यापूर्वी सकाळी आठपासूनच भाविकांची रीघ लागत असल्याचे दिसले. मोठ्या गर्दीमुळे मुंबई-आग्रा महामार्ग, सुरत बायपासवर अनेक तास वाहनांची दुतर्फा कोंडी झाली. त्यामुळे पोलिस आणि स्वयंसेवकांची दमछाक झाली. कथास्थळीच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल पंडित मिश्रा यांनी श्री शिवमहापुराण कथा सेवा समितीचे कौतुक केले...

A crowd gathered outside the pendulum on Saturday at Sri Shiv Mahapuran Kathasthala near Hare Medical College.
Dhule News : जिल्ह्यातील 302 गावांसह 39 वाड्यांना टंचाईची झळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com