पारोळा- येथील राष्ट्रीय महामार्ग ५३ वर बीओटी प्रणालीचे बसस्थानक आहे. या स्थानकाच्या माध्यमातून रोज अडीशे ते तीनशे बसफेऱ्या होतात. त्यामुळे सहजपणे पारोळा स्थानकातून दैनंदिन शाळकरी विद्यार्थ्यांसह हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, स्थानकात प्रवाशांसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच गेल्या पाच-सहा महिन्यांपासून स्थानकात वायरिंग झाली आहे. मात्र, आगारप्रमुखांच्या दुर्लक्षामुळे अजूनही पंखे न लागल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.