Latest Marathi News | खेडदिगर येथील Pick-upचोर अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nandurbar Crime News : खेडदिगर येथील Pick-upचोर अटकेत

नंदुरबार : खेड दिगर (ता. शहादा) येथून दुकानाजवळ उभे असलेले पिकअप वाहन चोरी प्रकरणी मध्य प्रदेश मधील एकास एलसीबी पोलिस पथकाने अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचा एक साथीदार फरार झाला आहे. दोन लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ डिसेंबरला रात्री खेडदिगर गावातील हिरा मोती फर्टिलायझरचे बाजूला पंडित गंगाराम चौधरी यांचे दोन लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन (एमएच ३९ सी ५५८३) चोरीस गेले होते. याबाबत म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nashik News : भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून 28 हजारांचा नायलॉन मांजा जप्त

चोरीस गेलेले वाहन धुळे शहरातील ८० फुटी रस्त्याच्या बाजूला मिळून आल्याने गुन्हे शोध पथकाने चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या आवारात वाहन आणले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला धुळ्यात पाठवून वाहन ताब्यात घेतले होते.

पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार खेडदिगर गावातून चोरी झालेली पिकअप ही बेहडीया (ता. पानसेमल जि. बडवाणी, मध्य प्रदेश) येथील सुनील पावरा, पिंटू ओंकार भिल यांनी चोरली असून ते गावातच फिरत आहे. श्री. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना ही माहिती दिली.

पथकाने सुनील पावरा याचा खेडदिगर गावात शोध घेतला असता तो खेडदिगर गावात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. विचारपूस केली असता चोरी केलेले पिकअप वाहन हे धुळे येथे विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन गेलो होतो, परंतु, वाहन विक्री न झाल्याने ते धुळे शहरातील ८० फुटी रस्त्याच्या बाजूला उभे करून तेथून पळून गेलो असल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचा: Nashik Christmas Natal : शांतता, एकोपा, प्रेम तारेल जगाला