नंदुरबार- नंदुरबार जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सहा पंचायत समिती व चार नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुकांना स्थगिती मिळाली होती. मात्र, आज उच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण जैसे थे ठेवण्याचे आदेश देत लवकरच निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.