
वयोवृद्ध महिलांनी नवे गोदिपुर यागावात येण्यासाठी रस्ताच नसल्याची समस्या मांडली.
शहादा: काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शहादा तालुक्यातील गोदीपुर ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच संजय पाडवी, उपसरपंच विजय वळवी,जेष्ठ कार्यकर्ता कांतीलाल वळवी सह कार्यकर्त्यांत्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी आमदार राजेश पाडवी, भाजपा प्रदेश सदस्य राजेंद्र गावित यांच्या हस्ते पक्षात स्वागत करण्यात आले.
आवर्जून वाचा- भाजप नगरसेवकाचा प्रताप; हात जोडून दखल न घेतल्याने अधिकाऱ्याला खड्यात ढकलत मारली कानाशिलात
यावेळी आमदार राजेश पाडवी यांच्या भेटी दरम्यान वयोवृद्ध महिलांनी नवे गोदिपुर यागावात येण्यासाठी रस्ताच नसल्याची समस्या मांडली. त्याबरोबर गावातील निराधार महिलांना घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा,गावातील बँड पथकाला साहित्य पुरवून देण्याची मागणी यावेळी तरुणांनी केली.
गावाचा विकास करू- आमदार पाडवी
यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की,गावात यायला रस्ताच नसल्याने आधी रस्ता तयार करण्यात येईल,त्याचबरोबर विधवा महिलेस पगार, घरकुल,वृध्दा चा पगार यां साठी कोणालाही अडचणी येत असतील माझ्याशी संपर्क साधावा तसेच गावात व्यायाम शाळा सुरू करण्यात येणार,गावात हायमस्ट लॅम्प बसविण्यात येईल असेही सांगितले.
वाचा- अट्टल गुन्हेगारांनी तरुणांना हेरले; गँग तयार करून गंभीर गुन्हे घडविण्याचा होता प्लॅन -
यांची होती उपस्थिती
यावेळी,प्रदेश सदस्य राजेंद्र गावीत, माजी जि.प सदस्य सुनिल चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा योगेश पाटील,अदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण ठाकरे,पंचायत समिती सदस्य डॉ.विजय चौधरी,अदिवासी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दंगल सोनवणे,गोविंद पटले,प्रविण वळवी,गोपाल पावरा,संरपच संजय पाडवी, उपसरपंच विजय वळवी,जेष्ठ कार्यकर्ते कांतीलाल वळवी, दिलवरसिंग पावरा उपस्थित होते.
संपादन- भूषण श्रीखंडे