esakal | वाद मिटत नसतील, तर गरजेनुसार मलमपट्टी ;राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

वाद मिटत नसतील, तर गरजेनुसार मलमपट्टी ;राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना इशारा

जखम मोठी असेल, तर प्रसंगी शस्त्रक्रिया करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, पक्ष संघटन हा एकमेव अजेंडा असून, तो राबवला जाणारच.

वाद मिटत नसतील, तर गरजेनुसार मलमपट्टी ;राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना इशारा

sakal_logo
By
सचिन पाटील


शिरपूर  : पक्षबांधणी हा आमचा एकमेव उद्देश आहे. पक्षाच्या ध्येयधोरणांना अनुसरूनच पदाधिकाऱ्यांची वाटचाल असावी. मतभेद मिटवून टाका. मिटत नसतील, तर आम्हाला सांगा. गरजेनुसार मलमपट्टी करू. जखम मोठी असेल, तर प्रसंगी शस्त्रक्रिया करण्यासही मागेपुढे पाहणार नाही; पण पक्ष संघटन हा एकमेव अजेंडा असून, तो राबवला जाणारच हे लक्षात घ्यावे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे यांनी दिला. 

आवश्य वाचा- धुळ्यात धडकी भरवणारी गर्दी ! कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवं पर्व अभियानाला कुरखळी (ता. शिरपूर) येथे माजी मंत्री (कै.) शिवाजीराव पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त  श्रीदत्त मंदिराच्या सभागृहात प्रारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस सुमित पवार, प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित शिसोदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, तालुकाध्यक्ष रमेश करंकाळ, मयूर बोरसे, कुणाल पवार, आशिषकुमार अहिरे, दिनेश मोरे, डॉ. मनोज महाजन, नीलेश गरुड, डॉ. राहुल साळुंखे, प्रदीप गोपाळ, श्यामकांत करंकाळ, प्रशांत दोरीक, प्रशांत वाघ, रामकृष्ण महाजन, धीरज सोनवणे, कनिलाल पावरा, गौतम थोरात, शिरीष पाटील, विलास पाटील, लीलाचंद लोणारी, परेश शिंपी, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. 


शिरपूर विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी दिनेश मोरे यांच्या नियुक्तीची घोषणा जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी केली. मोरे यांनी बूथस्तरावर पक्षबांधणीला वेग द्यावा, तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले. शिरपूर साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) शिवाजीराव पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यासोबत सहकार क्षेत्रात काम केलेल्या ज्येष्ठांचा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. ही ज्येष्ठ मंडळी म्हणजे पक्षाचा मजबूत पाया असून, त्यांचे मार्गदर्शन घ्यावे,  असे आवाहन सूरज चव्हाण यांनी केले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image